GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

नासिक जिल्ह्यात 8 नोव्हेंबर रोजी नो फ्लाय झोन मनाई आदेश

 


जनहित न्यूज24 : नासिक विशेष प्रतिनिधी                                       

प्रधानमंत्री, भारत सरकार,केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे 8 नोव्हेंबर 2024 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यानिमित्त ते नाशिक जिल्हा परिसरात ठिकठिकाणी भेट देणार आहेत.


 त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नासिक जिल्ह्यात दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजीचे रात्री 00.00 ते दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी 00.00 या कालावधीत ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.


उपरोक्त कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित साधन), पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाईटस् एअरक्राफ्ट आदी तत्सम हवाई साधनांमार्फत  सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचे उड्डाण/ वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. 


नासिक जिल्ह्यातील (ग्रामीण) ड्रोन चालक व मालकांनी सदर परिसरात 7 व 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ड्रोनचे उड्डाण करू नये. तसेच नाशिक जिल्ह्यात ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रीकरणाच्या परवानगी  बाबतचे संपूर्ण अधिकार  प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम, इंडियन एअर क्राफ्ट कायदा आणि इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.


टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.