जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गटाचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ येवला,लासलगाव, विंचूर शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजता लासलगाव शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली भगरीबाबा मंदिर – उमा हॉटेल – शिवाजी चौक – शनिमंदिर रोड – पिंजार गल्ली - पाटील गल्लीग – शिंपी गल्ली – झेंडा चौक या मार्गे जाऊन प्रचार कार्यालय – एस.टी.डेपो येथे समारोप होणार आहे. तर सोमवार दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत विंचूर शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रचार रॅलीला विंचूर तिनपाटी येथून सुरु होऊन डॉ. गुंजाळ दवाखाना – नेहरु चौक – नवीन मारुती मंदिर – खाडे गल्लीं – सिद्धार्थ कॉलनी – भवनी पेठ – मारवाडी पेठ मार्ग विंचूर तिनपाटी परिसर येथे समारोप होणार आहे.
सोमवार,दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला शहरात सकाळी ९ ते २ या वेळेत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रचार रॅलीला येवला संपर्क कार्यालय येथून सुरुवात होऊन विंचूर चौफुली - जगदंब फर्निचर - शनी पटांगन – थिएटर - आझाद चौक - देवी खुंट - आईना मस्जिद – जुना माळीपुरा - मलिक मेंबर घर - नागड दरवाजा – बुंदेलपुरा - सनी पटणी घर - मेन रोड - खांबेकर खुंट - शिंपी गल्ली - काळा मारुती - गंगा दरवाजा - फत्तेबुरुज नाका - डीजी रोड - खांबेकर खुंट मार्गे पुढे जाऊन इंद्रनील हॉटेल येथून पुढे शनिपटांगन येथे सांगता होणार आहे.
या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुती घटक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणियाँ0