जनहित न्यूज24 नासिक:विशेष प्रतिनिधी
पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व सौ.प्रिया कर्णिक तसेच नामांकित बांधकाम व्यवसायीक श्री दीपक चंदे व सौ.दीपा चंदे यांच्या हस्ते लेनोरा माईंडटयून कन्सल्टंट्ज या फर्मचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाला
दिनांक 09.11.2024 रोजी सायंकाळी 07.00 वा नाशिक शहरातील कालिका मंदीरासमोरील कालिका प्लाझा या वास्तूमध्ये सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे तथा मानसशास्त्रज्ञ संचलित लेनोरा माईंडटून या वेलनेस कौशलिंग व थेरपी सेंटरचा उद्घाटन समारंभ नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक व सौ प्रिया कर्णिक यांच्या शुभहस्ते तसेच नामांकित बांधकाम व्यवसायीक श्री दीपक चंदे व दीपा चंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.. यावेळी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे व पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव यांचे हस्ते या सेंटरमध्ये कलश ठेवण्यात आला.
कालिका प्लाझा या इमारतीमधील शॉप नंबर 223-224 या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित असलेल्या या कौशलिंग व थेरपी सेंटरचा नाशिक शहराच्या व जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ तसेच ऑनलाइन पद्धतीद्वारे देशातील तसेच देशाबाहेरील नागरिकांना देखील विशेष लाभ होणार असल्याबाबत पोलीस आयुक्त यांनी त्यांचे भाषणात नमूद केले..
यशस्वी होण्यासाठी धडपड करणारे विद्यार्थी,जीवनात आनंद सोधणारे जोडपे,वयस्क व्यक्ती,कामाच्या ठिकाणी तणाव जाणवणाऱ्या व्यक्ती, इंडस्ट्री मधील कामगार व उच्चपदस्थ व्यक्ती तसेच सेलिब्रिटी यांना विशेष लाभ होणार आहे. मानसिक समस्याग्रस्त व्यक्तींसाठी सायकोमेट्रिक टेस्टिंग करून शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयुक्त असे मार्गदर्शन या सेंटरमध्ये उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी या बाबीचा फायदा घ्यावा असे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व बांधकाम व्यवसायीक दीपक चंदे यांनी त्यांचे भाषणातून नागरिकांना आवाहन केले..
या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मा.पोलीस आयुक्त त्यासोबतच उपस्थित मान्यवर व स्नेहीजन यांनी या सेंटरचे संचालक डॉक्टर सिताराम कोल्हे व वैशाली कोल्हे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
या सेंटरच्या ऊभरणीत योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी या सेंटरचे डिझाईन करणाऱ्या श्री ईजि.व आर्किटेक्ट राजेंद्र पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील अहिरे सर व आभार प्रदर्शन श्री तेजस अहिरे यांनी केले.

टिप्पणियाँ0