GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

खडक माळेगाव परिसरातून भुजबळांना सर्वाधिक लीड देऊ ग्रामस्थांचा निर्धार


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)


मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध -  छगन भुजबळ

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये ४७ गावांमधील २६ गावांचा समावेश - छगन भुजबळ


येवला मतदारसंघाच्या विकासासाठी मला येथे आणण्यात आले. आपण याठिकाणी प्रतिनिधित्व केल्यानंतर गेल्या वीस वर्षात विकासाची सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली.यापुढील काळातही मतदारसंघातील नागरिकांचे प्रधानान्ये सोडविण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन  छगन भुजबळ यांनी केले.


येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ  खडक माळेगाव येथे भव्य जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी.के.जगताप, माजी सभापती सुवर्णाताई जगताप, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव शहराध्यक्ष बालेश जाधव,दत्तूपंत डुकरे, दत्तात्रय रायते, बाळासाहेब रायते,प्रमोद सस्कर,भाऊसाहेब लहरे, धनंजय कुलकर्णी,  मच्छिंद्र थोरात, नरहरी कापडी, मोहन जावळे,आनंद शिंदे, विनायक वाळूंज, तुषार वाघ,उन्मेष डुंबरे, विनायक भोरकडे, भागीनाथ पगारे,शिवाजी सुपनर, राहुल डुंबरे, बाजीराव घोरपडे, अनिल सोनवणे,कैलास सोनवणे, तुकाराम गांगुर्डे, संतोष राजोळे, माणिकराव शिंदे, मधुकर गायकर याच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.



यावेळी  छगन भुजबळ म्हणाले की, विकासाच्या बाबतीत जी वचने येथील लोकांना दिली ती पूर्ण केली आहे. आपण जे बोलतो ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. निवडणूक ही लोकांचे प्रश्न सोविण्यासाठी आहे. जातीपातीच्या राजकारणासाठी  नाही.येवल्याला जलसंजीवनी देण्यासाठी आपण मांजरपाडा सारखा प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्याला तर फायदा झाला. त्याचबरोबर मांजरपाडयाचे अतिरिक्त पाणी पालखेड कालव्याच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील शेतकरी वर्गाला देखील मोठा फायदा झाला आहे. खडक माळेगाव परिसरासाठी महत्वाचा असलेल्या सावरगाव लपा तलावाचे काम सुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर असून या परिसराला अधिक पाणी उपलब्ध होऊन परिसरातील शेतकरी अधिक समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



यावेळी ते पुढे म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये येवला मतदारसंघातील ५९ गावांचा आपण समावेश करून घेतला.त्यात ४७ गावांमधील २६ गावांचा यावर्षी समावेश झाला.पुढच्या वर्षी उरलेल्या सर्व गावांचा यात समावेश होईल.या प्रकल्पा अंतर्गत शेततळी, बागांची उभारणी, शेडनेट उभारणी, पॉली हाऊस उभारणी, सिंचनाच्या सोयी, यांत्रिकीकरण, शेती मशागतीची औजारे वितरण, शेतीची सुधारणा, सुपिकता वाढविणे अशा अनेक सुविधा यात मिळणार आहे.आगामी काळात महायुती सरकारच्या वतीने  लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० ऐवजी आता २१०० देण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात बरोबरच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला प्रत्येक वर्षाला रु. १२,००० ऐवजी १५,००० दिले जातील. त्याचबरोबर प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येऊन वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला रु.१५०० ऐवजी २१०० देण्यात येईल असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.



राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. त्यामुळे या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी  छगन भुजबळ यांचे नेतृत्व हे सक्षम आहे. त्यामुळे या भागातील राहिलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला विक्रमी मतांनी  छगन भुजबळ यांना पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे असे आवाहन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी केले.


विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे.  छगन भुजबळ यांनी मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली आहे. परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटल्याने खडक माळेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अधिक मोठा फायदा होणार आहे. या पाण्यावर अनेक पिढ्यांना लाभ होईल त्यामुळे येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी म्हटले आहे.


मांजरपाड्याच्या पाण्याचा फायदा केवळ येवल्याला नाही तर ओझरखेड कालव्याला पाणी येऊन निफाड तालुक्याला देखील फायदा मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मतदारसंघातील १ लाख १० हजार महिलांना लाभ झाला आहे. ही योजना गरजवंत महिलांना या योजनेचा अतिशय फायदा झाला आहे.महिलांच्या सशक्तीकरणासाठी महायुती सरकारचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे विकासपुरुष, जलनायक मंत्री छगन भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे असल्याचे आवाहन माजी सभापती सुवर्णाताई जगताप यांनी केले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.