GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

परमपूज्य भगरीबाबा यांची 60 वी पुण्यतिथी लासलगावात उत्साहात साजरी.


जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)


लासलगांव व परीसरातील नागरीकांचे आराध्य दैवत प. पू. भगरीबाबा यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. 15/12/2024 ते दि. 21/12/2024 ह्या सप्ताह कालावधीत दररोज ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ध्यान साधना आश्रम, रूई यांच्या अमृतवाणीतुन संगीतमय श्री नवनाथ भक्तीसार कथा, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक ह. भ. प. मधुकर महाराज गांगुर्डे व ह. भ. प. अशोक महाराज संत यांच्या उपस्थितीत सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरीपाठ व दि. 22/12/2024 रोजी काल्याचे किर्तन आणि महाप्रसाद इ. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



पुण्यतिथीनिमित्त मंदीर परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बाजार समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत आवारे यांच्या शुभहस्ते सपत्नीक बाबांची विधीवत पुजा व आरती करण्यात आली. त्यानंतर लासलगांव शहरातुन बाबांची प्रतिमा व पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत लासलगाव व परीसरातील पुरूष, महिला भजनी मंडळ, बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष जयदत्त होळकर, बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे, महेश पठाडे, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह कांदा व्यापारी वाल्मिकराव जाधव, दत्तात्रय खुर्दे, ओम चोथाणी, संतोष माठा, मनिष सारस्वत, अनिल बांगर, संदीप गोमासे, नाना सुर्यवंशी, बाबा अमरनाथ ग्रुप, प. पू. भगरीबाबा भक्त मंडळ व श्री गायत्री परीवाराचे सर्व सदस्य, यांचेसह परीसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


सदर मिरवणुक प. पू. भगरीबाबा मंदीर, मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथ मार्गे शिवाजी चौक, झेंडा चौक, अहिल्याबाई चौक, पाटील गल्ली, संत नामदेव पथ, आदिवासी हौ. सोसायटी मार्गे समाधी मंदीराजवळ विसर्जीत करण्यात आली. मिरवणुक मार्गावर त्र्यंबक उपाध्ये, दिपा उपाध्ये व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संपुर्ण गावात आकर्षक रांगोळी काढुन मिरवणुकीची शोभा वाढवली. यावेळी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ध्यान साधना आश्रम, रूई यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.


  प. पू. भगरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भगरीबाबा मंदीरात श्री साईनाथ रक्तपेढी, नाशिक यांच्या सौजन्याने सकाळी 10 ते 4 ह्या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीरात बाबांच्या 60 व्या पुण्यतिथी निमित्त 35 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. 


त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा उपस्थित भाविक भक्त व नागरीकांनी लाभ घेतला. पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी प. पू. भगरीबाबा भक्त मंडळ, बाबा अमरनाथ ग्रुप, प. पू. भगरीबाबा दिंडी सोहळ्याचे सर्व सदस्य, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहाय्यक सचिव तथा सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, सुशिल वाढवणे, काकासाहेब जगताप, पंकज होळकर, हिरालाल सोनारे, संदीप होळकर, संदीप निकम, मनोज शेजवळ, संजय होळकर, संतोष गायकर, राहुल शेजवळ, स्वप्निल पवार, गोरख विसे, ज्ञानेश्वर जगताप, गणेश आहेर, सागर खुटे, अरूण ठाकरे यांचेसह सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परीश्रम घेतले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.