GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

लासलगाव येथे स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे यांची जयंती साजरी


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)


मूठभर कार्यकर्ते पेरून,पोतंभर नेते पिकवण्यासाठी काबाडकष्ट करणारून देशभर कमळाची शेती फुलवणारा दुहेरी हाडाचा "वनमाळी" म्हणजे  मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज लासलगाव येथे भाजपा लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपा जेष्ठ नेते प्रकाश शेठ दायमा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.


स्मिता कुलकर्णी यांनी आठवणीतील दैवत  सामन्य कुटुंबातून आलेले गोपीनाथ राव ते संघर्ष योद्धा यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीत संधी देत नेते बनवण्याचा संघर्ष आपण केला तरच गोपिनाथ रांवाचे वैचारिक वारसा चालवण्याचे समाधान आपल्याला मिळेल भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी व त्यांना सक्षम करण्याचे ध्येय ठेवू असे मनोगत व्यक्त केले.

 भाजपा जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ चाफेकर यांनी गोपीनाथ रावांच्या लासलगाव व त्यांच्या सोबत च्या आठवणींना उजाळा देत आभार मानले.


 यावेळी लासलगावचे सरपंच अफजल भाई शेख लासलगाव शहर अध्यक्ष शेखर होळकर डॉ सुरशे संपतराव नागरे निलेश जगताप डॉ विलास कांगणे  बालेश जाधव बाळासाहेब होळकर प्रितेश आब्बड डॉ पवार संतोष पवार कांतीलाल नागरे विलास जगताप खलसे भाऊ मोहन आव्हाड  अनिल भागवत मयुर वाघचौरे राहुल जाधव ,सचिन शिंदे ,अमित गंभिरे ,निलेश जगताप ,पिंटू गायकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.