GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

लासलगाव प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनाची लासलगाव आगार प्रमुखांनी घेतली तात्काळ दखल


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)


शासनाने जाहीर केलेल्या महामंडळाच्या बसेस मध्ये दिव्यागांसाठी आसन व्यवस्था कायम स्वरुपी आरक्षित ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे परन्तु त्या नियमांचे पालन  बऱ्याच ठिकाणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


दिव्यांगांना आसन मिळण्यास अक्षरशः वाद करावे लागत असल्याचे दिसून येत आहे त्याकरिता लासलगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष अनिल भावसार व  संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील दिव्यांग बांधवानी पाऊल उचलत लासलगाव आगारप्रमुख सौ सविता काळे यांना निवेदन देऊन आगारातील चालक वाहक यांना या शासनाच्या जीआर वर अमल बजावणी करण्या संदर्भात सूचना देण्यास सांगितल्या तसेच प्रवाशांना याबद्दल माहिती होण्यासाठि लासलगाव बस स्थानकात एक फलक  लाऊन त्याबद्दल जागृती करावी जेणेकरून प्रवासी या दिव्यांगांना दिलेल्या आरक्षित आसनावर बसतांना विचार करतील असे निवेदन देण्यात आले होते.



या निवेदनांची तात्काळ दखल घेत  लासलगाव आगारप्रमुख सौ.काळे मॅडम यांनी संघटनेचे अध्यक्ष अनिल भावसार यांना संपर्क करून फलक तयार झाल्याचे कळवले.


गुरुवार दिनांक ०२/०१/२०२४ रोजी आगार प्रमुखांनी बनवलेला फलक प्रहार संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान भाऊ गांगुर्डे यांच्या शुभ हस्ते लासलगाव बसस्थानकात लावण्यात आला.

यावेळी लासलगाव  प्रहार संघटनेचे अध्यक्ष अनिल भावसार,उपाध्यक्ष मनोज परेराव,विंचूर प्रहार संघटनेचे अध्यक्ष  फकिरा भाऊ सूर्यवंशी, सपर्कप्रमुख आण्णा रायते,पिंपळगाव नजीक येथील संतोष भुजबळ तसेच परिसरातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बसस्थानकात फलक लावल्याबद्दल प्रहार संघटनेचे महाराष्ट्र सपर्कप्रमुख चंद्रभान भाऊ गांगुर्डे तसेच लासलगाव, विंचूर प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लासलगाव आगारप्रमुख तसेच आगार कर्मचारी याचे आभार मानले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.