जनहित न्यूज24 नासिक प्रतिनिधी:रोशन गव्हाणे
मकर संक्रांत निमित्ताचे औचित्य साधत परीसस्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विरंगुळा हॉल टाकळी रोड व्दारका नाशिक येथे हळदी कुंकू समारंभ संस्थेच्या अध्यक्ष भारती ताई पाटील यांच्या मार्गर्शनाखाली घेण्यात आला. व्यासपीठावर पाहुणे अनिता भामरे, सीमा पवार, संध्या मराठे, स्वाती भालेराव, गायत्री अवसारे यासह संस्थेच्या पदाधिकारी विराजमान होत्या.
मकर संक्रांत वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. ज्या मध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतिक म्हणून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हळद आणि कुंकू यांची देवाणघेवाण करतात. हळदी कुंकू बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून भेट वस्तू भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्ष अनिता ताई भामरे यांच्या वतीने वाटण्यात आल्या.


.jpg)
टिप्पणियाँ0