जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)
येवला येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस. एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार श्री संजय शिरसाठ यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी नाशिक विभाग विधान परिषदेचे शिक्षक आमदार श्री किशोर भाऊ दराडे यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना महाविद्यालयीन जीवनातील आठवणी जाग्या झाल्या रिक्षा चालक ते मंत्री ह्या ४० वर्षाचा संघर्षाचा प्रवास त्यानी प्राध्यपक व विध्यार्थ्यांना सांगितला.
रिक्षावाला ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास नवोदित राजकारणात प्रवेश करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आयुष्यात स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. जीवनात कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही त्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागते . सूत्रसंचालन डॉ प्रकाश रोकडे यांनी केले.
यावेळी संचालक श्री. रुपेषभाऊ दराडे , श्री सिद्धांत दराडे , प्राचार्य डॉ डी एम यादव , रजिस्ट्रार श्री दत्तात्रय क्षीरसागर,शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. संदीप येवले व इतर पदाधिकारी होते


.jpg)
टिप्पणियाँ0