जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन फोटो)
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लासलगाव एसटी डेपोमध्ये भाडेवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं सर्व भागात जाणाऱ्या बस या ठिकाणी अडवण्यात येऊन शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणा देऊन भाडेवाढ रद्द करावी व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन आगार प्रमुख सविता शेळके मॅडम यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर तालुकाप्रमुख शिवा पाटील सुराशे जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप उपजिल्हाप्रमुख रवींद्र काळे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप मा पंचायत समिती सदस्य उत्तमराव वाघ शहरप्रमुख प्रमोद पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख भैया भंडारी जिल्हा उपसंघटक सुनील आब्बड उपशहर प्रमुख रविराज बोराडे उप शहरप्रमुख राहुल वाघ वसंत खुर्दे केशव ठाकरे निलेश वडनेरे संदीप कोकणे अदिसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

.jpg)
टिप्पणियाँ0