GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

केंद्र सरकार वस्त्रोदयोग हैंडीक्राफ्ट आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या पुढाकारातून लासलगाव येथे महिला मेळावा संपन्न



 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )




स्त्रियांना हव् तसे त्यांच्या कुवतीप्रमाणे कार्य करण्याची संधी देणे म्हणजे खर्या अर्थाने सक्षमीकरण~ सुवर्णा जगताप


केंद्र सरकार वस्त्रोदयोग हैंडीक्राफ्ट आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या पुढाकारातून लासलगाव येथे महिला मेळावा संपन्न झाला.पाच जिल्ह्यांचे काम सांभाळत असलेले कोल्हापूरवरून आलेले केंद्र सरकारचे प्रतिनिधी आकाश मूलिक यांनी मार्गदर्शन केले आणि नाशिक जिल्हा कोठ्यातील प्रलंबित कामे लवकर करण्यात येतील असे नमूद केले.हस्तकला हातमाग संबंधित कार्ड लवकरच वितरित करण्यात येतील असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या अध्यक्षा मायाताई परदेशी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.


लासलगाव परिसरातील महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रतिबद्ध आहे आणि जे जे करता येईल त्यासाठी मदत करण्याची ग्वाही लासलगाव कृ ऊ बा समितीच्या माजी सभापती तसेच दीप कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा ली च्या मॅनेजिंग डायरेक्टर सुवर्णा ताई जगताप यांनी सांगितले.


भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. महिला सक्षमीकरण धोरणे महिलांना कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी होण्याच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात, मग ते उद्योजकता, कौशल्य विकास कार्यक्रम किंवा रोजगार कोट्याद्वारे असो.महिलांची स्वतःचे महत्व ओळखण्याची भावना; निवड करण्याचा आणि निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार, घराच्या आत आणि बाहेर स्वतःच्या जीवनावर ,सामाजिक दिशांवर प्रभाव पाडण्याची त्यांची क्षमता...हेच खर्या अर्थाने महिला सक्षमीकरण आहे.


बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर नितीन बाविस्कर यांनी मुद्रा लोन आणि इतर लोन यांचा महिलांना होणारा फायदा सांगितला..नंतर मायाताई परदेशी,गौरव परदेशी,बँक ऑफ महाराष्ट्र लोन डिपार्टमेंट मॅनेजर सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आभार कविता आवारे यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कविता आवारे,सुरेखा कदम,ज्योती नेटारे,संध्या आहिरे,सुनीता बोडके,संगीता आव्हाड,सीमा पाटील,वैशाली गोर्डे,मनीषा नेटारे,यशश्री नेटारे..यांनी प्रयत्न केले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.