GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्ताने सौ सोनिया होळकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कर्तबगार महिलांचा गुणगौरव सोहळा संपन्न


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )


लासलगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सोनिया होळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने समाजातील विशेष नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार २०२५ सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला ४ वाजता वेफको ऑफिस लासलगाव येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सरपंच योगिता पाटील ,पुष्पाताई दरेकर ,स्वाती बुब ,अमिता ,ब्रम्हेचा ,डॉ .उषा बनसोडे, डॉ संगिता सुरसे मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू सोनियाताई यांनी आपल्या भाषणातून स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. त्यांनी आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करून दाखवली अशा तळागाळातील व सर्व घरातील महिलांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे त्यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते या उदात भावनेतून सत्कार समारंभ आयोजित केल्याचे सोनियताई होळकर म्हणाल्या.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारपूर्ती महिलांचा परिचय आणि त्यांनी केलेली उत्कृष्ट कामाची माहिती श्रीम. नलिनीताई शिंदे पाटील मॅडम यांनी दिली कार्यक्रम प्रसंगी अमिता  ब्रम्हेचा, प्रतीक्षा दायमा, दिपाली उपाध्ये, अनिता पवार, चंद्रकला गांगुर्डे, भाग्यश्री सोनवणे, वर्षा दायमा, पुष्पाताई दरेकर, स्मिता कुलकर्णी, स्वाती बुब, शेवटी अध्यक्ष सरपंच योगिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमात सत्कार आर्थी सौ. उषा पवार, सुनीता वर्मा,सीमा दरेकर,ज्योती वाघचौरे, प्रमिला सपकाळे, दुर्गा गुंजाळ ,अर्चना सोनवणे, वाकचौरे ताई, विमल कदम, पल्लवी दाभाडे, अश्विनी जाधव, काद्री सिस्टर, डॉ श्रीदेवी चांडक, योगिता माळी,नंदा वाघ, सिंधुताई पाल्हाळ, सीमा पाटील, चंद्रकला गांगुर्डे,प्राजक्ता भंडारी, संगीता गरुड, जनाबाई विस्ते, भारती कुमावत, विमलबाई शेजवळ, संगीता शेजवळ, अशा एकूण ३५ महिलांचा सत्कार केला.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.