GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश लासलगाव येथील 'ब' सत्ताप्रकार मिळकती नियमित करण्यास राज्य शासन सकारात्मक...


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )



 रेडीरेकनरच्या  १५% दराने कर भरून  वर्ग २ मधून १ करण्यात येणार

ज्यावेळी खरेदी विक्री व्यवहार विना परवानगीने झाला त्यावेळच्या मूल्यांकनाचे ६०% दंड भरून झालेला शर्थभंग नियमित करण्यात येईल.

 लासलगाव येथील 'ब' सत्ताप्रकार मिळकती क सत्ता प्रकारात नियमित करण्यास राज्य शासन सकारात्मक असून चालू रेडीरेकनराचा दर भरून नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी व ब सत्ताधारक समितीमध्ये बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल यासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात त्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत दिली. 



राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नावर आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केलेले होते. या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने समीर भुजबळ, महसूल विभागाचे सहसचिव, ब सत्ता धारकांच्या वतीने समितीचे अध्यक्ष शैलेश ठाकरे मयूर झांबरे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारध्ये,जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सानप साहेब,निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे साहेब इत्यादी ऑनलाईन द्वारे बैठकीस उपस्थित होते.


 लासलगाव ता. निफाड जि. नाशिक येथील 'ब' सत्ताप्रकार मिळकती नियमित करणेबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे  व ब सत्ता प्रकार संघर्ष समितीचा साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

यावेळी ब  सत्ताधारकांच्या प्रश्नाबाबत माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव ता. निफाड जि.नाशिक येथील सर्व्हे नं.९३ मधील सदरचे प्लॉट रहिवासी प्रयोजनासाठी १९४६ साली स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी लिलावाने वाटप केलेले होते. यातील बऱ्याच मिळकत धारकांनी विनापरवानगी खरेदी विक्री केल्याने शर्थभंग झालेले होते. 


सबरजिस्टर यांनी त्यावेळी सदरचे दस्त नोंदवून घेतले आहे. यातील काही नोंदी बाकी असल्याने सदर नोंदणी शर्थभंग नियमित करून मिळण्यासाठी नागरिकांची मागणी होती. बिनशेती सारा भरण्यास पात्र मिळकती या 'क' सत्ताप्रकारात येतात. लासलगाव येथील मिळकतींना चुकून 'ब' सत्ताप्रकार लागलेला होता. त्यामुळे 'ब' सत्ताप्रकार मिळकत धारकांच्या 'ब' सत्ता मिळकती नियमित करण्याची मागणी आहे. याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी समीर भुजबळ यांनी यावेळी केली. 

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लासलगाव येथील १७३ कुटुंबांचा हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. खरंतर त्याचवेळी रेडीरेकनरच्या दरानुसार कर लावून मार्गी लावणे गरजेचे होते. यामुळे अनेक दिवसांपासून शासनाचा महसूल देखील बुडत आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांच्या समवेत ब सत्ताधारक समितीची बैठक घेऊन रेडीरेकनरच्या दराने सदर ब सत्ताधारकांना क सत्ताधारकामध्ये समाविष्ट करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी आणि ब सत्ताधारक समिती यांच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार समीर भुजबळ यांनी घ्यावी आणि यातून हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, शासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असून लवकरच या ब सत्ताधारक समितीच्या नागरिकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी संपर्क आवश्यक ती मदत आम्ही करू असे यावेळी सांगितले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.