GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

यतीन कदम यांची नाशिक ग्रामीण उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लासलगाव येथे भाजपा मंडलातर्फे सत्कार


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )


भारतीय जनता पक्षाच्या वतीने यतीन कदम यांची नाशिक ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा लासलगाव मंडलातर्फे व कृ.उ.बा. समितीचे सभापती डी. के. जगताप व भाजपा. नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तर महाराष्ट्र महामंत्री सुवर्णा जगताप,मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांच्या हस्ते लासलगाव येथील गणेश मंदीराचे प्रांगणात सत्कार करण्यात आला..



या कार्यक्रमाप्रसंगी बाजार समितीचे सभापती  डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ,यतीन कदम यांना राजकीय वारसा लाभला आहे.यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे .त्यामुळे त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची चांगली जाणीव आहे.





लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा संचालिका व भा.ज.पा. नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तर च्या अध्यक्षा सौ.सुवर्णा जगताप यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.  एक अभ्यासू व सामाजिक सामाजिकतेचे भान असलेले असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे. नाशिक भागाचा सखोल अभ्यास असल्यामुळे ते जनसामान्याचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची तळमळ ही त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत.  लासलगाव मंडळातील प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्ता आणि बुथ प्रमुख, हा यतीन कदमच्या मागे खंबीरपणे उभा राहील.


भा.ज.पा. मंडल अध्यक्ष  निलेश चालकाडे यांनी मंडलाचा आढावा मांडला..आणि उपस्थित सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी यतीन कदम यांनी भाजपाच्या वतीने सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले..


भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा सत्कार सोहळा आयोजित करत भाजप लासलगाव मंडळ नी केलेला हा प्रेमपूर्वक सत्कार अत्यंत नम्रतेने स्वीकारला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवलेल्या आणि साथ दिलेल्या भाजप कार्यकर्त्यांची आभार मानतो..येणाऱ्या पुढील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकीमध्ये भाजपा च्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन केले..पक्ष पूर्ण ताकद लावेलच तुम्हीही साथ द्या आणि जिल्ह्यात ताकद दाखवा…


 कार्यक्रमाचे निमित्ताने अध्यक्ष यतिन कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला…भाजपा ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचांलन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला..

या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा चे बापूसाहेब पाटील, ॲड वाल्मीकराव गायकवाड, राजूशेठ राणा, संतोष पलोड,निलेश सालकाडे, रमेश पालवे,शेखर होळकर, दत्तोपंत डुकरे, सोमनाथ गांगुर्डे, तुकाराम गांगुर्डे,  दत्तूलाल शर्मा, डॉ. सालगुडे, मनीष चोपडा, निलेश लचके, आयाज शेख, डॉ. योगेश डुंबरे,लक्ष्मण खालसे, सचिन लचके, निलेश जगताप, सुरेश बकरे, संतोष राजोळे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश फड, राजू नागरे, संजय महाले, सुशील भोसले,सुनील नेवगे, नवनाथ जाधव, अनिल सोनवणे,अरुण भामरे, विजय कांकरिया, मामा खिलवाणी , ओम् चव्हाण,उषा कुमावत, रंजना शिंदे, ज्योती शिंदे, शैलजा भावसार, शीतल शिंदे, पूजा भावसार,सोनाली शिंदे,रश्मी माठा, नंदा शर्मा, मंजुषा केंगे,भारती महाले, सिंधू पल्हार,सर्व बूथ प्रमुख, मंडलातील सर्व भाजपा कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.