जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )
लासलगाव येथील संस्कार (कलगीधर) इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रमुख मान्यवरांचा हस्ते स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ध्वजारोहण समारंभासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर,पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जाधव , शरद बागल, मेजर राजेंद्र कोल्हे, पत्रकार शरद लोहकरे , संस्थेच्या विश्वस्त व संचालिका नंदा डमरे, रश्मी दगडे, मनीषा होळकर व प्राचार्या अश्विनी कुशारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पवन सुपनर सरांनी स्वातंत्र्य आणि देशभक्तीच्या मूल्यांवर प्रकाश टाकत एक महत्त्वाचा संदेश दिला.
तसेच पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जाधव यांनी निरोगी आणि अंमली पदार्थमुक्त समाजाचे महत्त्व अधोरेखित करून अंमली पदार्थांचे व्यसन टाळण्याची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. हुजैफा शेख, दिव्यांशी सुपनर, श्रीतेज लोहकरे श्रावणी चव्हाणके व जोबिया शेख या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वावर प्रेरणादायी भाषणे दिली.विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रभावी परेड, डंबेल आणि शिवकला यांचे सादरीकरण केले. यासर्व सादरीकरणांमधील शिस्तबद्धता लक्षणीय ठरली. संस्कृती कातुरे, आर्यन सांगळे, दिव्यांशी सुपनर आणि जारा खान यांनी त्यांच्या मनमोहक नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शरद लोहकरे यांनी या प्रसंगी भारतमातेची प्रतिमा शाळेस भेट म्हणून दिली तर पवन शर्मा या पालकांनी विद्यार्थ्यांस मिठाई वाटप केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्यापिका मंगला कदम, हेडमास्तर सारिका पाटील, को ऑडिनेटर माधवी सहाय तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुमित्रा व्यास व शितल शिंदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता मनिषा अभंग यांनी वंदे मातरम या गीताने केली.






टिप्पणियाँ0