GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


 

जनहित न्यूज24 प्रतिनिधी: राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )


एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला येथे  दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी  महाविद्यालय मध्ये 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. 



 संस्थेचे   सेक्रेटरी श्री लक्ष्मण दराडे   यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. लक्ष्मण भाऊ दराडे   म्हणाले की आपण आपल्या देशासाठी काहीतरी चांगल  करण्याचा संकल्प करूया .  ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे हा दिवस त्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा दिवस आहे.देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे  तरुण पिढीचे कर्तव्य आहे .  



माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. पी .पी. रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .  प्राचार्य डॉ  डी. एम यादव  यांनी सर्वांचे आभार मानले. 


  

  यावेळी  प्राचार्य डॉ  डी. एम यादव ,  प्रशासकीय अधिकारी श्री सुनिल  पवार, रजिस्ट्रार डॉ. डी. पी. क्षीरसागर , सिविल विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी, ईतरविभागप्रमुख,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.




  संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे,  संचालक श्री रुपेश भाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे  यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  दिल्या.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.