GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

अन्न, नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दोन महत्त्वाच्या जागा उपलब्ध


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी : राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )


येवला-लासलगाव मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दोन महत्त्वाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.





यामध्ये सुभाषनगर येथे ८ हेक्टर ६१.५६ आर इतकी जमीन "उपबाजार या सार्वजनिक प्रयोजनासाठी" नाममात्र ०१ रुपये दराने भाडेतत्त्वावर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तर खानगाव नजिक खरेदी-विक्री केंद्रासाठी ३.५० हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा शासन दराने संपादित करण्याचा प्रस्तावही वन विभागाकडे दाखल करण्यात आला आहे.



या निर्णयामुळे सुभाषनगर व खानगाव नजिक परिसरातील शेतकरी बांधवांना जवळच शेतमाल विक्रीची सुविधा होणार असून, त्यांच्या वेळ व खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. यासोबतच अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपबाजार उभारला जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.


लासलगाव बाजार समितीचे सभापती श्री. डी. के. (नाना) जगताप यांनी याबाबत माहिती देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.