जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:शरद लोहकरे
राष्ट्रीय चर्मकार महासंघ वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवंता लॉन्स, नांदूर नाका,नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला.
प्रास्ताविकात चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, संघटनेच्या कार्याचा आढावा यावेळी सादर केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण भानुदास विसावे होते. विसावे साहेब यांनी समाज संघटनाचे महत्व समजावून सांगितले. सर्व क्षेत्रात प्रगती साधता येईल या ध्येयाने विद्यार्थी व समाज बांधवांनी कार्यरत राहिले पाहिजे. जाती- पोट जाती यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रगती कशी साधता येईल यासाठी सर्वांनी मार्गक्रमण करावे. प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर करताना अभ्यास असो किंवा व्यवसाय असो मेहनतीतून यश संपादन करावे असे उपस्थितांना संबोधित केले.
प्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे यांनी तरुणांनी विविध लघुउद्योंगांकडे वळावे यासाठी मार्गदर्शन केले . दत्तात्रय गोतिसे साहेबांनी कौटुंबिक सलोखा ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले .एच ए .एल चे जी .एम मा.चौधरी साहेब यांनी सदर समाजातील गुणवंतांचा गौरव करणे ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगितले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे ( चित्रपट निर्माते व लेखक), राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतीसे,वसंतराव बावीस्कर,डाॅ प्रशांत पाटोळे,बर्वे साहेब,सहयोगी अधिष्ठाते बबनराव इल्हे ,संदिप सरवार , राज्यसचिव अनिल कानडे,.मोहनशेठ पवार,संपर्क प्रमुख आनंदा महाले , प्रमोद नाथेकर ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पवार एच ए एल चे पदाधिकारी हितेद्र सौंदानकर,युवा अध्यक्ष निकितेश धाकराव ,नाशिक शहर उपाध्यक्ष संतोष धाकतोडे ,नाशिक पूर्व अध्यक्ष अमित लोहकरे इ.पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समाजातील दहावी, बारावी, पदवीधर गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती झालेले कर्मचारी, पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी आदींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय वाघ सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक शहराध्यक्ष विष्णू लोहकरे ,ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रदिप अहिरे,जिल्हा कार्याध्यक्ष अमोल म्हैसधुणे ,जिल्हा सचिव दादा पठाडे ,चर्मकार देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राजू सूर्यवंशी ,नाशिक पश्चिम अध्यक्ष शरद पवार ,साई अक्षदा विवाह मंडळ अध्यक्ष साहेबराव घोलप,गठई कामगार अध्यक्ष रामनाथ सरवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप आहिरे यांनी केले.




टिप्पणियाँ0