GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त भाजपा लासलगाव मंडल यांच्या वतीने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य अभियान संपन्न


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी :राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )



भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त लासलगाव येथे भारतीय जनता पक्ष ,लासलगाव मंडल यांच्या वतीने महामंत्री सुवर्णा जगताप आणि मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी राजेंद्र चाफेकर,शंतनू पाटील,डॉ युवराज पाटील,योगेश पाटील,मनीष चोपडा,भारती महाले,स्मिता कुलकर्णी,पूजा भावसार,नीलेश लचके,गणेश फड,संतोष राजोळे,भगवान बोराडे,संजय चांदे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांसाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर आयोजित केले.


डॉ बाळकृष्ण अहिरे,वैद्यकीय अधिक्षक गट अ वर्ग -१ डॉ स्वप्नील पाटील, वैद्यकीय अधिकारी, वर्ग -२ डॉ अभय जेजुरकर, वैद्यकीय अधिकारी, वर्ग -२ डॉ सुमित आव्हाळे, वैद्यकीय अधिकारी, वर्ग -२ व इतर अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय, लासलगाव यांचे सहकार्य लाभले..डॉ अभय जेजुरकर यांनी ग्रामीण रुग्णालय मधे होत असलेले उपचार,सुविधा आणि रुग्णांनी घेण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.



भाजपा पदाधिकारी सौ सुवर्णा जगताप,राजेंद्र चाफेकर,शंतनू पाटील,डॉ युवराज पाटील यांनी शिबिरा निमित्त मनोगत व्यक्त केले.सुवर्णा जगताप यांनी महिलांच्या आरोग्य बाबत जास्तीत जास्त जागृती आणणे गरजेचे आहे.



महिलांच्या आरोग्य संबधित सर्व चाचण्या मोफत करून मिळाव्यात आणि ज्या चेकअप व्यवस्था नसतील तर त्या लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून मिळाव्यात असे नमूद केले.आयुष्मान कार्ड,आभा कार्ड आणि वयोवंदना कार्ड या सर्व सुविधा येथे होत असल्याने सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे नमूद करून सर्व भाजपा पदाधिकारी यांनी डॉक्टर्स, परिचारिका, मेडिकल स्टाफ यांचे सहकार्य बद्दल आभार मानले.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.